धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूरचे माजी आमदार नरेंद्र बोरगावकर यांचं आज पहाटे पुण्यात एका खाजगी रुग्णालयात निधन झालं. ते ८७ वर्षांचे होते. बोरगावकर यांनी लातूर, बीड, धाराशिव या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचं काही काळ प्रतिनिधित्व केलं होतं. तत्कालीन उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं होतं. त्यांच्या पार्थिव देहावर आज तुळजापूर इथं अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
Site Admin | October 20, 2024 5:53 PM | नरेंद्र बोरगावकर
माजी आमदार नरेंद्र बोरगावकर यांचं निधन