गोंदिया विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिला आहे. येत्या १३ सप्टेंबर रोजी वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती त्यांनी आज वार्ताहर परिषदेत दिली. काँग्रेसकडून सलग पाचवेळा आमदार राहिलेले गोपालदास अग्रवाल यांनी २०१९मध्ये भाजपाच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला. गेल्या पाच वर्षांत भाजपात राहून हव्या त्या पद्धतीनं गोंदिया विधानसभा मतदारसंघाचा विकास करता न आल्यानं आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये परतत असल्याचं अग्रवाल यांनी नमूद केलं.
Site Admin | September 8, 2024 6:07 PM | Gopaldas Agarwal
माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांची भाजपाला सोडचिट्टी
