माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी हाती धरली तुतारी

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. भाजपा सोडताना आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्याशी चर्चा करून आपली भूमिका मांडल्याचं पाटील यांनी सांगितलं. इंदापुरातल्या कार्यकर्त्यांच्या आणि जनतेच्या आग्रहामुळे हा निर्णय घेतल्याचं पाटील म्हणाले. हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता यांनीही भाजपाच्या सर्व पदांचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.