डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

August 21, 2024 8:04 PM | Champai Soren

printer

झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन यांची नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा

झारखंड मुक्ती मोर्चामधल्या वाढत्या तणावानंतर झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी आज नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली. झारखंडच्या सरायकेला – खरसावन इथं आपल्या मतदारसंघातल्या जाहीर सभेत ते बोलत होते. आपण राजकीय संन्यास घेत नसून नव्या आघाड्या करण्यासाठी तयार आहोत. त्यामुळे समविचार पक्षांशी आपण हातमिळवणी करू, असं सोरेन यावेळी म्हणाले.