डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

भारताचे माजी हॉकी गोलरक्षक मॅन्युएल फ्रेडरिक यांचं निधन

भारताचे माजी हॉकी गोलरक्षक मॅन्युएल फ्रेडरिक यांचं आज वयाच्या ७८ व्या वर्षी निधन झालं. केरळच्या कन्नूर इथले रहिवासी असलेले फ्रेडरिक यांनी १९७२ म्युनिक ऑलिम्पिक मध्ये कांस्य पदक पटकावलं होतं. आपल्या धाडसी गोलरक्षणाबद्दल परिचित असलेल्या फ्रेडरिक यांनी १९७१ ते १९७८ दोन विश्वचषकांमध्ये सहभाग घेतला.

 

२०१९ मध्ये यांना ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.