June 24, 2025 3:02 PM

printer

भारताचे माजी फिरकी गोलंदाज दिलीप दोशी यांचं निधन

भारताचे माजी फिरकी गोलंदाज दिलीप दोशी यांचं सोमवारी रात्री लंडन इथे हृदयविकारामुळे निधन झालं. ते ७७ वर्षांचे होते. उत्कृष्ट फिरकी गोलंदाज आणि यशस्वी हिंदी क्रिकेट समालोचक म्हणून ते लोकप्रिय होते. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आठशे अठ्ठ्याण्णव बळी घेणाऱ्या दिलीप दोशी यांनी २३८ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ४३ वेळा ५ बळी घेतले. एका सामन्यात दहा बळी घेण्याचा विक्रम त्यांना सहा वेळा केला होता. भारतासाठी खेळण्याव्यतिरिक्त, दोशी यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये तसंच परदेशी कौंटी क्रिकेटमध्येही आपलं कौशल्य दाखवलं होतं. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं दोशी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.