डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

माजी फूटबॉलपटू भूपिंदर सिंग रावत यांचं निधन

भारतीय फूटबॉलपटू भूपिंदर सिंग रावत यांचं वृद्धापकाळानं निधन झालं. ते ८५ वर्षांचे होते. देशांतर्गत फूटबॉल सामन्यांमध्ये ते दिल्ली गॅरिसन, गोरखा ब्रिगेड, मफतलाल यासारख्या संघांमधून खेळले होते. 

१९६९मध्ये मलेशियातल्या मेरडेका सामन्यात भारताचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या  भारतीय फूटबॉल संघातही ते होते. अनेक स्थानिक स्तरावरच्या संघांचं तसंच संतोष करंडकसारख्या राज्यपातळीवरच्या स्पर्धांमध्येही त्यांनी फूटबॉल संघांचं नेतृत्व केलं होतं. संतोष करंडक स्पर्धेत त्यांनी महाराष्ट्राचंही प्रतिनिधित्व केलं होतं. अखिल भारतीय फूटबॉल फेडरेशननं रावत यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.