डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

इराणच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत माजी आरोग्य मंत्री मसूद पेजस्कियान विजयी

इराणच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत माजी आरोग्य मंत्री मसूद पेजस्कियान हे विजयी झाले आहेत. मतदानाच्या काल झालेल्या दुसऱ्या टप्प्यात त्यांना तीन कोटी मतांपैकी एक कोटी साठ लाख मतं पडली. २८ जून रोजी मतदानाच्या पहिल्या टप्प्यात पेजस्कियान यांना एकूण मतांपैकी ४२ पूर्णांक सहा दशांश टक्के मतं पडली होती, तर त्यांचे प्रतिस्पर्धी सईद जलीली यांना ३८ पूर्णांक आठ दशांश टक्के मतं पडली होती.

 

इराणच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एकूण मतांच्या पन्नास टक्के मतं पडणं आवश्यक असतं, त्यामुळे काल दुसऱ्या टप्प्यातलं मतदान घेण्यात आलं. यात पेजस्कियान यांनी विजय मिळवला. इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचं १९ मे रोजी हेलीकॉप्टर अपघातात निधन झाल्यामुळे ही निवडणूक घेण्यात आली.