डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

झारखंडमधे सरकार स्थापनेसाठी माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा राज्यपालांकडे दावा

झारखंडमधे सरकार स्थापनेसाठी माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा राज्यपालांकडे दावा
झारखंड मुक्ती मोर्चाचे कार्याध्यक्ष हेमंत सोरेन पुन्हा एकदा झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळणार आहेत. झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल या इंडी आघाडीच्या घटक पक्षांच्या बैठकीत सोरेन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. विद्यमान मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांच्या रांची इथल्या निवासस्थानी ही बैठक झाली. चंपाई सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. हेमंत सोरेन यांना आर्थिक घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं अटक केल्यानंतर त्यांनी ३१ जानेवारी रोजी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी आज राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा पेश केला.