ब्राझिलचे माजी अध्यक्ष जेयर बोल्सेनारो यांना २०२२ मधे निवडणुकीत गैरप्रकार केल्याबद्दल दोषी ठरवलं आहे. तिथल्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांना २७ वर्ष आणि ३ महिन्यांचा कारावास सुनावला आहे. न्यायालयं विसर्जित करणं, लष्कराला अनिर्बंध अधिकार देणं, निवडून आलेल्या राष्ट्राध्यक्षाच्या हत्येचा कट रचणं,इत्यादी आरोप त्यांच्यावर होते. ७० वर्षांचे बोल्सेनारो यांच्याबरोबरच ब्राझिलचे तत्कालीन संरक्षण मंत्री आणि नौदल प्रमुख यांच्यसह ६ जणांना न्यायालयाने दोषी ठरवलं आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचा बोल्सेनारो यांना पाठिंबा होता. त्याबद्दलही ब्राझिलच्या सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत.