December 30, 2025 1:57 PM

printer

बांगलादेशच्या माजी प्रधानमंत्री खालिदा झिया यांचं निधन

बांगलादेशच्या माजी प्रधानमंत्री खालिदा झिया यांचं आज सकाळी ढाका इथं निधन झालं.  त्या ८० वर्षांच्या होत्या. दोन वेळा प्रधानमंत्री पदावर राहिलेल्या खालिदा झिया, यांनी अनेक दशकं बांगलादेशच्या राजकारणावर आपला प्रभाव पडला, आणि बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीचं अध्यक्षपद भूषवलं. खालिदा झिया यांच्या पार्थिवावर येत्या बुधवारी अंत्यसंस्कार होणार आहेत. 

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बेगम खालिदा झिया यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. बांगलादेशच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री म्हणून, बांगलादेशच्या विकासात, तसंच भारत-बांगलादेश संबंधांमध्ये त्यांनी दिलेलं योगदान नेहमीच स्मरणात राहील, असं त्यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या शोक संदेशात म्हटलं आहे. 

बांगलादेशचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांनी खालिदा झिया यांच्या निधनाबद्दल,  देशात तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.