वक्फ सुधारणा विधेयकाच्या परीक्षणासाठी संयुक्त संसदीय समितीची स्थापना

वक्फ सुधारणा विधेयकाच्या परीक्षणासाठी संयुक्त संसदीय समितीची स्थापना करण्याचा प्रस्ताव आज लोकसभेत मंजूर झाला. या समितीत लोकसभेतले २१ तर राज्यसभेतले १० खासदार आहेत. लोकसभेतले जदंबिका पाल, निशिकांत दुबे, तेजस्वी सूर्य, दिलीप साईकिया, गौरव गोगोई, नरेश म्हस्के, सुरेश म्हात्रे, अरविंद सावंत, इम्रान मसूद, मोहम्मद जावेद, असदउद्दीन ओवैसी, कल्याण बॅनर्जी या सदस्यांचा समावेश आहे. ही समिती संसदेच्या पुढच्या अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात शेवटच्या दिवशी अहवाल सादर करील असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी ठराव मांडताना सांगितलं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.