October 22, 2025 1:20 PM | Forest

printer

वन संरक्षणासाठीच्या जागतिक क्रमवारीत भारत नवव्या स्थानी

भारताने वन संरक्षणासाठीच्या जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर झेप घेतली आहे. इंडोनेशियात बाली इथं अन्न आणि कृषी संघटनेने ही जागतिक वन संसाधन मूल्यांकन २०२५ क्रमवारी जाहीर केली. सर्वाधिक जास्त वनक्षेत्र विकसित करणाऱ्या देशांना या क्रमवारीत स्थान मिळतं. गेल्या वर्षी या क्रमवारीत भारताला दहावा क्रमांक मिळाला होता. यंदा त्यात सुधारणा झाल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी दिली आहे. वन संरक्षण, वनीकरण आणि पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने सरकारने सुरू केलेल्या विविध उपक्रमांचं हे यश असल्याचं यादव म्हणाले.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.