July 6, 2024 1:41 PM | NBEMS

printer

NBEMSद्वारे घेतली जाणारी फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट परीक्षा आज होत आहे

NBEMS अर्थात वैद्यकशास्त्र राष्ट्रीय परीक्षा मंडळाद्वारे घेतली जाणारी फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट परीक्षा आज होत आहे. परदेशातून वैद्यकीय पदवी घेणाऱ्या डॉक्टरांना भारतात वैद्यकीय क्षेत्रात काम करण्यासाठी ही परीक्षा द्यावी लागते. देशभरात ५० शहरातल्या ७१ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होत आहे.

 

कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी २५५ निरीक्षक आणि ५३ प्राध्यापकांच्या फिरत्या पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्नपत्रिका डाऊलोड झाल्या असून परीक्षा सुरळीत सुरू झाल्याचं NBEMS नं सांगितलं आहे.दरम्यान, वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीच्या नीट पीजी परीक्षेचं सुधारित वेळापत्रक राष्ट्रीय परीक्षा मंडळाने काल जाहीर केलं. ही परीक्षा ११ ऑगस्ट रोजी दोन सत्रात होणार आहे.