September 22, 2024 8:05 PM

printer

परदेशी गुंतवणुकदारांची भारतीय शेअर बाजारात ३३ हजार ६९१ कोटी रुपयांची गुंतवणूक

परदेशी गुंतवणुकदारांनी या महिन्यात भारतीय शेअर बाजारात, आतापर्यंत ३३ हजार ६९१ कोटी रुपये गुंतवले आहेत. मात्र त्याचवेळी ऋणबाजारातून २४५ कोटी रुपये काढून घेतले आहेत. त्यामुळे त्यांची या महिन्यातली भारतीय भांडवल बाजारातली गुंतवणूक ३१ हजार ४४६ कोटी रुपये इतकी झाली आहे. या वर्षात आतापर्यंत परदेशी गुंतवणुदारांनी भारतीय भांडवल बाजारात १ लाख ८० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे.