देशाच्या परकीय चलन साठ्यात २५ एप्रिल रोजी संपलेल्या आठवड्यात अंदाजे २ अब्ज डॉलर्सची वाढ झाली असून तो सुमारे ६८८ अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. रिझर्व्ह बँकेनं प्रकाशित केलेल्या साप्ताहिक आकडेवारीत म्हटलंय की, गेल्या आठवड्यात, परकीय चलन मालमत्ता, २ अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक वाढून सुमारे ५८० अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. दरम्यान, विशेष कर्जपात्रता हक्क २कोटी १०लाख डॉलर्सनं वाढून १८ अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक झाले आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये मध्यवर्ती बँकेची पतही २० लाख डॉलर्सने वाढून साडेचार अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. तथापि, सोन्याचा साठा २०७ दशलक्ष डॉलर्सनं कमी होऊन ८४ पूर्णांक ३७ शतांश अब्ज डॉलर्सवर आला आहे.
Site Admin | May 3, 2025 12:22 PM | Foreign Exchange Reserves
देशाच्या परकीय चलन साठ्यात २ अब्ज डॉलर्सची वाढ नोंदवत ६८८ अब्ज डॉलर्सवर: RBI
