December 4, 2024 8:11 PM | EAM Dr S Jaishankar

printer

पराराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांची कुवैतचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्दुल्लाह अली अल याह्या यांच्याशी चर्चा

पराराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी आज नवी दिल्लीत कुवैतचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्दुल्लाह अली अल याह्या यांच्याशी चर्चा केली. भारत कुवैतबरोबर ऊर्जा, गुंतवणूक,  माहिती आणि तंत्रज्ञान, व्यापार आदी क्षेत्रांमधले द्विपक्षीय संबंध  दृढ  करण्यासाठी वचनबद्ध आहे, असं जयशंकर  या चर्चेदरम्यान म्हणाले. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये  प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय परिस्थितीविषयी  चर्चा झाली. कुवैतमध्ये राहणारे भारतीय दोन्ही देशातले दुवा म्हणून काम करतात  असंही जयशंकर यावेळी म्हणाले.