परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांचा आज श्रीलंका दौरा

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर आज श्रीलंकेच्या अधिकृत दौऱ्यावर जात आहेत. त्यांच्या या दौऱ्यात ते श्रीलंकेच्या नेतृत्वाची भेट घेणार आहेत. भारताच्या शेजारधर्म प्रथम या धोरणानुसार तसंच सागर दृष्टिकोनाला अनुसरून दोन्ही देशांचे पूर्वीपासूनचे संबंध अधिक बळकट करण्याच्या सामायिक बांधिलकीवर या दौऱ्यात प्रकर्षानं भर दिला जाईल, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून सांगण्यात आलं.