डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

May 19, 2025 12:18 PM | Football

printer

फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेतील कालच्या सामन्यात भारताला विजेतेपद

19 वर्षांखालील दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघाच्या फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं विजेतेपद पटकावलं. अरुणाचल प्रदेशमधल्या युपिया इथं काल झालेल्या चुरशीच्या अंतिम सामन्यात भारतीय संघानं पेनल्टी शूट आउटमध्ये बांग्लादेशच्या संघावर 4-3 अशा गुणांनी मात केली.

 

भारतीय संघाचा कर्णधार शामी यानं सामन्यात दुसऱ्याच मिनिटांत बांग्लादेशविरुद्ध पहिला गोल केला. बांग्लादेशच्या संघानं शेवटच्या काही मिनिटांत गोल करत सामन्यात बरोबरी साधली. मात्र निर्णायक क्षणी शामीनं केलेल्या गोलमुळे भारताला विजय मिळवता आला.