October 28, 2024 2:50 PM

printer

फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या ऑनलाईन तक्रार निवारण प्रणालीचा प्रारंभ

फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या ऑनलाईन तक्रार निवारण प्रणालीचा प्रारंभ आज नवी दिल्ली इथं केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते झाला. या प्रणालीद्वारे तक्रार नोंदणीपासून ते तोडगा काढण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. देशातल्या भात गिरण्यांमधून तयार झालेला भात खरेदी करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं आश्वासन यावेळी प्रल्हाद जोशी यांनी दिलं. तक्रार निवारण करण्याची ही सर्व प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने होईल, अशी माहिती देखील जोशी यांनी यावेळी दिली.