डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

कर्करोगावरची औषधं आणि नमकीन पदार्थांवरच्या जीएसटीमध्ये कपात

कर्करोगावरच्या औषधांवरचा जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर १२ वरुन ५ टक्के करण्याचा निर्णय आज झाला. नमकीन आणि इतर पदार्थांवर १८ टक्क्यांऐवजी १२ टक्के जीएसटी लादण्याचा निर्णय झाल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. जीएसटी परिषदेच्या आज नवी दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर त्या बोलत होत्या. 

आरोग्य वीम्यावर लादलेला १८ टक्के जीएसटी कमी करण्याची मागणीवर नोव्हेंबरमध्ये निर्णय घेतला जाईल, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. हा मुद्दा मंत्र्यांच्या समुहाकडे पाठवलेला आहे. त्यांना ऑक्टोबरपर्यंत शिफारशी सुचवायला सांगितल्याची माहिती त्यांनी दिली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.