डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची ब्रिक्स देशांच्या अर्थमंत्र्यांशी बैठक संपन्न

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी काल रिओ दी जानेरो इथं ब्रिक्स देशांच्या अर्थमंत्र्यांशी बैठका घेऊन धोरणात्मक भागीदारी आणखी बळकट करण्यासाठी विविध क्षेत्रातला सहयोग वाढवण्यासह द्विपक्षीय सहकार्याच्या इतर मुद्द्यावर चर्चा केली. ब्रिक्स देशांचे अर्थमंत्री आणि केंद्रीय बँकांच्या गव्हर्नर्सच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर, सीतारमण यांनी रशियाचे अर्थमंत्री अँटॉन सिलुआनोव्ह यांच्याशी आर्थिक क्षेत्रातल्या द्विपक्षीय सहकार्याबद्दल, तसंच न्यू डेव्हलपमेंट बँक या विषयावर संवाद साधला. चीनचे अर्थमंत्री लान फोआन यांच्याशी चर्चेदरम्यान सीतारमण यांनी, समावेशक जागतिक विकास आणि नवोन्मेषाच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावण्याची क्षमता भारत आणि चीनकडे असल्याचं सांगून द्विपक्षीय सहकार्य आणखी बळकट करण्याची गरज अधोरेखित केली. ब्राझीलचे अर्थमंत्री फर्नांडो हडड यांच्याशी बोलताना निर्मला सीतारमण यांनी ग्लोबल साऊथ, कॉप-३० आणि पर्यावरणीय अर्थव्यवस्था, तसंच संयुक्त राष्ट्र, जी-२०, ब्रिक्स आणि जागतिक व्यापार संघटना अशा मंचांमध्ये सहभागावर भर दिला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा