जपानमध्ये पुर परिस्थिती निर्माण झाल्यानं ३० हजार लोकांना स्थलांतरणाचे निर्देश

जपानमध्ये मुसळधार पावसामुळे पुर परिस्थिती निर्माण झाल्यानं दोन शहरांमधल्या सुमारे ३० हजार लोकांना स्थानिक प्रशासनानं स्थलांतरणाचे निर्देश दिले आहेत. वाजिमा शहरातल्या १८ हजार तर सुझू शहरातल्या १२ हजार जणांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करावं लागणार आहे. वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार या भागातल्या १२ नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत असून इशिकावा, यामागाटा, निगाटा यासारख्या अति मुसळधार पाऊस झालेल्या शहरात भूस्खलनाचा इशाराही देण्यात आला आहे.