विमान वाहतूक ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता असून त्याच्या सुरक्षेबद्दल कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असं केंद्रीय विमान वाहतूकमंत्री राममोहन नायडू यांनी म्हटलं आहे. ते काल राज्यसभेत पुरवणी प्रश्नाला उत्तर देत होते.
उड्डाणं रद्द का झाली याची चौकशी सरकार करत आहे. सरकारनं हे प्रकरण गांभीर्याने घेतलं असून यात दोषी असणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असं नायडू म्हणाले. देशाला किमान पाच मोठ्या विमान कंपन्यांची गरज आहे. त्यासाठी मंत्रालय प्रयत्नशील असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.