परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने पारपत्र सेवा कार्यक्रमाचे अद्ययावत प्रारुप जारी केल्याचं घोषित केलं आहे. यामध्ये पारपत्र सेवा कार्यक्रम, ई-पारपत्र तसंच भारताबाहेर असलेल्या भारतीय नागरिकांसाठी असलेला ग्लोबल पारपत्र सेवा कार्यक्रम यांचा समावेश आहे. यावर्षी २६ मे रोजी लाँच झालेला पारपत्र सेवा कार्यक्रम प्रारुप ३७ पारपत्र कार्यालये, ९३ पारपत्र सेवा केंद्रे आणि ४५० टपाल कार्यालयातल्या पारपत्र सेवा केंद्रांमध्ये सुरु झाल्याची माहिती मंत्रालयाने दिली आहे. यातील ई-पासपोर्ट सुविधा ही आंतराराष्ट्रीय दर्जाची असून अधिक जलद सेवा पुरवते असंही मंत्रालयाने म्हटलं आहे.
Site Admin | November 13, 2025 7:54 PM
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचं पारपत्र सेवा कार्यक्रमाचं अद्ययावत प्रारुप जारी