फिच या जागतिक पतमापन संस्थेनं चालू आर्थिक वर्षासाठी भारताच्या विकास दराचा अंदाज साडेसहा टक्क्यावरून वाढवून ६ पूर्णांक ९ दशांश टक्के केला आहे. देशांतर्गत मागणी, वाढता ग्राहक खर्च आणि त्याला पूरक आर्थिक परिस्थिती, यांमुळे आधीच्या अंदाजात सुधारणा केल्याचं फिचनं आपल्या अहवालात म्हटलं आहे.
भारताने केेेलेल्या जीएसटीमधल्या सुधारणांमुळे भारतीय कंपन्यांना लाभ होईल, खरेदीला चालना मिळेल आणि त्यामुळे, अमेरिकेनं लादलेल्या अतिरिक्त करवाढीमुळे निर्यात मागणी धोक्यात आली असूनही भारताची आर्थिक वाढ चांगली राहील, अशी अपेक्षा फिचनं व्यक्त केली आहे.