डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धांमधे भारताला १२ पदकांची कमाई

 जर्मनीत झालेल्या एफआयएसयू जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धांमधे भारतानं एकंदर १२ पदकांची कमाई केली. यात २ सुवर्ण, ५ रौप्य आणि ५ कांस्यपदकांचा समावेश आहे. शेवटच्या दिवशी अंकिता ध्यानी हिनं महिलांच्या तीन हजार मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत रौप्यपदक पटकावलं, तर पुरुषांच्या रिले आणि महिलांच्या रेस वॉक संघांनी दोन कांस्यपदकं भारताला मिळवून दिली. स्पर्धेच्या पदकतालिकेत भारत २०व्या स्थानावर राहिला. जपाननं ३४ पदकांसह पहिलं स्थान मिळवलं, तर अमेरिका २८ सुवर्णपदकांसह दुसऱ्या स्थानी राहिली.