आचरा समुद्रात मासेमारी करणारी छोटी नौका उलटून तिघांचा मृत्यू

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आचरा समुद्रात मासेमारी करणारी छोटी नौका उलटून आज तिघांचा मृत्यू झाला. मालवण तालुक्यातल्या सर्जेकोट इथून मासेमारीला गेलेली छोटी नौका आचरा हिर्लेवाडी इथल्या समुद्रात दाट धुक्यामुळे दुर्घटना ग्रस्त झाली. या दुर्घटनेत तीन मच्छिमारांचा मृत्यू झाला तर एका खलाशानं पोहत किनारा गाठल्यानं तो बचावला.  

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.