डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

कॅटमरान प्रवासी बोटीच्या घटनेप्रकरणी मंत्री नितेश राणे यांचे चौकशीचे आदेश

रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग समुद्राजवळ कॅटमरान प्रवासी बोटीच्या काल झालेल्या घटने प्रकरणी मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र सागरी मंडळाने यासाठी त्रिसदस्य चौकशी समिती स्थापन केली असून ती या दुर्घटनेची सविस्तर आणि सखोल चौकशी करून तीन दिवसात राज्य सरकारला अहवाल सादर करणार आहे. अजंठा कंपनीच्या या बोटीची सर्व प्रमाणपत्र निलंबित करत पुढील आदेशापर्यंत प्रवासी वाहतूक करण्यास निर्बंध घातले आहेत. गेटवे ऑफ इंडिया इथून मांडवा येथे 130 प्रवाशांना घेऊन जाण्यासाठी निघालेल्या या बोटीत मांडवा जेट्टीजवळ समुद्राचं पाणी शिरल्यावर इतर बोटींनी तत्काळ बोटीवरच्या प्रवाशांना दुसऱ्या बोटीत  घेऊन मांडवा जेट्टी येथे पोहचवलं होतं.

 

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा