मुंबई मराठी पत्रकार संघ आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक राज्यस्तरीय स्पर्धेत ‘हंस’ या दिवाळी अंकाला प्रथम पुरस्कार घोषित झाला आहे. एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. ‘अंतरीचे प्रतिबिंब’ या दिवाळी अंकाला द्वितीय पुरस्कार तर ‘अक्षर’ या अंकाला तृतीय पुरस्कार घोषित झाला आहे. तसंच मुलांसाठीच्या दिवाळी अंकांच्या गटात ‘वयम’ या अंकाला प्रथम पुरस्कार घोषित झाला आहे.