पहिला राष्ट्रीय अंतरिक्ष दिन उद्या साजरा होणार

भारताच्या यशस्वी चांद्रयान मोहिमेनिमित्त पहिला राष्ट्रीय अंतरिक्ष दिन उद्या देशभरात साजरा केला जाणार आहे.यानिमित्त देशभरात एक हजाराहून अधिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे,असं अंतरिक्ष राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी काल नवी दिल्लीत सांगितलं. यानिमित्त बंगळुरूमधल्या जवाहरलाल नेहरू तारांगणमध्येदेखील विशेष कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं आहे, असं तारांगणचे संचालक आणि इस्रोचे माजी शास्त्रज्ञ डॉ बीआर गुरुप्रसाद यांनी सांगितलं.