डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

November 10, 2024 7:56 PM | bird flu | Canada

printer

कॅनडातल्या ब्रिटिश कोलंबियामध्ये पहिल्यांदा एका मुलाला बर्डफ्ल्युची लागण

कॅनडातल्या ब्रिटिश कोलंबियामध्ये एका कुमारवयीन मुलाला बर्डफ्ल्युची लागण झाली असून एच-५ या विषाणूमुळे कोंबड्या आणि पक्षांना होणाऱ्या या आजाराची लागण माणसांना व्हायची त्या देशातली ही पहिलीच वेळ आहे. लहान मुलांसाठीच्या विशेष रुग्णालयात या मुलावर उपचार सुरु असून अशी लागण होण्यामागच्या कारणांचा शोध घेतला जात असल्याची माहिती तिथल्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.