चालू आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर ७ पूर्णांक ४ दशांश टक्के राहण्याचा अंदाज केंद्र सरकारनं वर्तवला आहे. यापूर्वी हा दर साडे ६ टक्के राहील असा अंदाज वर्तवण्यात आला होता.
चालू आर्थिक वर्षात देशाचं ढोबळ राष्ट्रीय उत्पन्न २०१ लाख कोटी रुपयांहून अधिक होण्याची शक्यता आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात हे उत्पन्न १८८ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल, असा सरकारचा अंदाज आहे.
उत्पादन आणि बांधकाम क्षेत्रातल्या वाढीमुळं आर्थिक वृद्धीदर ७ टक्क्यांच्या पलीकडे जाऊ शकतो असं केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं म्हटलं आहे.