मुंबईत गोरेगाव इथं व्हिसलिंग वुड्स इंटरनॅशनल फिल्म सिटी कॉम्प्लेक्समध्ये आज सकाळी आग लागली. अनुपमा स्टुडिओच्या ५ हजार चौरस फूट परिसरात लागलेल्या या आगीत इलेक्ट्रिक वायरिंग, इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन, कॅमेरे, स्टुडिओ उपकरणं, सजावटीचं साहित्य, पोशाख, प्रकाश व्यवस्था, आदी सामानाचं नुकसान झालं.
अग्निशमन दलानं चार बंब आणि ६ जेटींच्या साहाय्यानं आग आटोक्यात आणली. या आगीत जीवित हानी झालेली नाही. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा अग्निशमन दलाचा अंदाज आहे.