डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

April 12, 2025 7:49 PM | Pankaj Chaudhary

printer

५१५ कोटी रुपयांहून अधिक रकमेचा डिमांड ड्राफ्ट अर्थ राज्यमंत्र्यांकडून सुपूर्द

मालमत्ता विमोचन समितीचे अध्यक्ष डी के सेठ यांच्याकडे ५१५ कोटी रुपयांहून अधिक रकमेचा डिमांड ड्राफ्ट अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी आज सुपूर्द केला. रोझ व्हॅली पॉन्झी घोटाळ्यातील मूळ गुंतवणूकदारांना मालमत्ता परत करण्यासाठी मालमत्ता विमोचन समिती स्थापन केली आहे. या रकमेतून समितीकडे दाखल झालेल्या ३१ लाख दाव्यांपैकी साडेसात लाख गुंतवणूकदारांच्या रकमा अंशतः परत करणं शक्य होणार आहे. रोझ व्हॅली समूहाविरुद्ध पश्चिम बंगाल, ओदिशा, आसाम आणि त्रिपुरा राज्यांमध्ये दाखल झालेल्या तक्रारींवरून सक्तवसुली संचालनालय अधिक तपास करत आहे.