नवी दिल्लीत आज वित्तीय सेवा विभागाचे सचिव एम नागराजू यांच्या अध्यक्षेतेखाली विमा कंपन्या आणि आरोग्य सेवा पुरवणाऱ्या संस्थांची बैठक झाली. आरोग्य विमा धारकांना अधिक चांगलं मूल्य मिळावं यासाठी रुग्णालयं आणि विमा कंपन्यांमधलं सहकार्य वाढणं गरजेचं आहे, असं नागराजू यांनी सांगितलं. विमा कंपन्यांनी सेवांचा दर्जा उच्च राखवा, असं आवाहन या बैठकीत करण्यात आलं. विमा धारकांना रुग्णालयात दाखल होताना तसंच बिलं मंजूर करून घेण्यात अडचणी येऊ नयेत यासाठी दावा निपटारा प्रक्रियेची गती वाढवावी अशी सूचनाही मंत्रालयानं दिली. बैठकीत वैद्यकीय क्षेत्रातली महागाई आणि वाढता प्रीमियम खर्च या मुद्द्यांवर चर्चा झाली.
Site Admin | November 14, 2025 6:44 PM | policy
विमा कंपन्यांनी पॉलिसीधारकांना जलद सेवा द्यावी, असं अर्थमंत्र्यांचं आवाहन