हवामान बदलामुळे पायाभूत सुविधांवर प्रतिकूल परिणाम होत असून विकासाची गती मंदावल्याचं अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन

हवामान बदलामुळे पायाभूत सुविधांवर प्रतिकूल परिणाम होत असून त्यामुळे विकासाची गती मंदावल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन काल म्हणाल्या. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसी इथे भरलेल्या जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या वार्षिक बैठकीत त्या बोलत होत्या. आर्थिक गर्तेत सापडलेल्या देशांना कर्ज फेडण्यासाठी नव्या आर्थिक ताणाला सामोरं जावं लागू नये यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची गरज असल्याचंही सीतारामन यांनी यावेळी अधोरेखित केलं. या दौऱ्यादरम्यान सेंटर फॉर ग्लोबल डेव्हलपमेंटने आयोजित एका चर्चासत्रात जागतिक प्रगतीसाठी बहुपक्षीय विकास गरजेचा असल्याचं प्रतिपादन सीतारामन यांनी केलं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.