डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

व्यापार आणि उद्योग क्षेत्रातल्या प्रतिनिधींसोबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची अर्थसंकल्पपूर्व बैठक

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आज दिल्लीत अर्थसंकल्पपूर्व बैठक झाली. या बैठकीत व्यापार आणि उद्योग प्रतिनीधी तसंच आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातले तज्ञ सहभागी झाले होते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आज या बैठकीला वित्त, गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभाग, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग आणि केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार यासह अनेक विभागांचे सचिव उपस्थित होते.  २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारी रोजी संसदेत सादर होण्याची अपेक्षा आहे. अर्थमंत्री सीतारामन यांचा हा सलग आठवा अर्थसंकल्प असेल.