डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

देशभरातल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना गरजेचा असलेला निधी केंद्र सरकार देईल-अर्थमंत्री

सर्व राज्यांमधल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात आयटीआयना कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित केंद्रांमध्ये अद्ययावतीकरण करण्यासाठी गरजेचा असलेला सर्व निधी केंद्र सरकार देईल, असं आश्वासन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिलं. नवी दिल्ली इथं भारतीय गुणवत्ता व्यवस्थापन फाउंडेशनच्या परिसंवादात त्या आज बोलत होत्या. उद्योगविश्वाच्या बदलत्या गरजांशी जुळवून घेण्यासाठी आयटीआयचा कायापालट होत असल्याचं त्या म्हणाल्या. गेल्या दोन ते तीन अर्थसंकल्पांमध्ये नागरिकांच्या कौशल्य विकासासाठी सरकारनं तरतुदी केल्याचंही त्यांनी सांगितलं.