फिजीचे प्रधानमंत्री सिटीवेनी लिगामामाडा राबुका आजपासून भारताच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. केंद्रीय शिक्षण राज्य मंत्री सुकांता मजुमदार यांनी आज सकाळी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. फिजीच्या प्रधानमंत्र्यांची पत्नी तसंच त्यांचे आरोग्य मंत्री रातू अटोनियो लालाबालावू आणि इतर अधिकाऱ्यांचं शिष्टमंडळ त्यांच्याबरोबर आहे.
प्रधानमंत्री राबुका यांनी पद स्वीकारल्यापासून भारताला दिलेली ही पहिलीच भेट असून ते उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतील. ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेणार आहेत.