FIH हॉकी स्पर्धेच्या युरोप दौऱ्यासाठी भारतीय पुरुष संघाची घोषणा

एफआयएच हॉकी स्पर्धेच्या युरोप दौऱ्यासाठी भारतीय पुरुष संघाची घोषणा आज करण्यात आली. २४ खेळाडूंच्या या संघाचं नेतृ़त्व हरमनप्रीत करणार आहे. ७ जून ते २२ जून दरम्यान ही स्पर्धा होणार आहे. ७ आणि ९ जूनला भारताचा सामना नेदरलँडच्या संघाशी होणार आहे. त्यानंतर १४ आणि १५ जून रोजी ऑस्ट्रेलियाशी भारतीय संघाची लढत होईल.