एफआयएच (F.I.H) हॉकी पुरुषांच्या कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेत काल भारतानं अर्जेंटिनावर ४-२ अशी मात करून कांस्यपदक पटकावलं.
सुरवातीला अर्जेंटिनानं दोन गोल करून आघाडी मिळवली मात्र नंतर भारताच्या अंकित पाल, मनमीत सिंह, शारदानंद तिवारी आणि अनमोल एक्का यांनी प्रत्येकी एक गोल केला आणि कांस्यपदकावर नाव कोरलं.
स्पर्धेच्या अंतिम सामन्यात गतविजेत्या जर्मनीनं स्पेनचा ३-२ असा पराभव करून पुन्हा एकदा जेतेपद मिळवलं.