डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

May 23, 2025 7:24 PM | America | Iran

printer

अमेरिका-इराण अण्वस्त्र विषयक चर्चेची पाचवी फेरी सुरू

अमेरिका आणि इराण दरम्यान सुरु असलेल्या अण्वस्त्र विषयक चर्चेची पाचवी फेरी आज इटलीतल्या रोममध्ये सुरु झाली आहे.  यापूर्वी लादलेले आर्थिक निर्बंध शिथिल करण्याच्या मोबदल्यात इराणच्या अण्वस्त्र विषयक उपक्रमाला आळा घालण्याचा अमेरिकेचा उद्देश आहे. मात्र यापूर्वी झालेल्या चर्चेच्या चौथ्या फेरीदरम्यान इराणनं आपला युरेनियम संवर्धनाचा उपक्रम स्थगित करायला स्पष्ट नकार दिला होता. अमेरिकेनं  चर्चेच्या पाचव्या फेरीत पुन्हा हीच मागणी लावून धरली,  तर इराण ही मागणी पुन्हा एकदा फेटाळून लावेल, असं इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची  यांनी आजची चर्चा सुरु होण्यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. याउलट अमेरिका इराणच्या युरेनियम संवर्धन उपक्रमाला अजिबात मान्यता देणार नाही, असं अमेरिकेच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केलं आहे.   

 

अमेरिकेनं लादलेल्या आर्थिक निर्बंधांमुळं इराणच्या अर्थव्यवस्थेवर होणारा विपरीत परिणाम कमी करणं हा इराणचा उद्देश आहे. मात्र   गेल्या २० जानेवारीला राष्ट्रपती पदावर विराजमान झाल्यापासून डोनाल्ड ट्रम्प यांनी  इराणवर  अधिकाधिक दडपण आणायला सुरुवात केली आहे.  सध्या सुरु असलेल्या चर्चेतून काही निष्पन्न झालं नाही, तर  इराणवर लष्करी कारवाई करण्याचा पर्याय अवलंबावा लागेल, असा गर्भित इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा