अमेरिका आणि इराण यांच्यातील अप्रत्यक्ष चर्चेची पाचवी फेरी आज रोम इथं आयोजित करण्यात आली आहे. ओमानचे परराष्ट्र मंत्री सय्यद बद्र बिन हमद बिन हमूद अल्बुसैदी यांनी ही घोषणा केली. एप्रिलपासून आतापर्यंत झालेल्या चर्चेच्या चार फेऱ्यांपैकी तीन मस्कतमध्ये तर एक रोममध्ये पार पडल्या.
इराणचा अणुकार्यक्रम आणि अमेरिकेनं अद्यापही न हटविलेले निर्बंध यामुळे रेंगाळलेली राजनैतिक स्तरावरील बोलणी पुन्हा सुरू करण्याच्या उद्देशानं ओमाननं या चर्चेचं आयोजन केलं आहे.