फिफा विश्वचषक फूटबॉल स्पर्धेची प्राथमिक फेरी येत्या ५ डिसेंबरपासून

फिफा विश्वचषक फूटबॉल स्पर्धेची प्राथमिक फेरी येत्या ५ डिसेंबरपासून वॉशिंग्टन इथं सुरू होणार आहे. याच्या दुसऱ्या दिवशी स्टेडियम आणि किक-ऑफ सह सामन्यांचं वेळापत्रक जाहीर होईल. पुढच्या वर्षी ११ जूनपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेचं संयुक्त यजमानपद अमेरिका, मॅक्सिको आणि कॅनडा या तीन देशांकडे आहे. स्पर्धेचा अंतिम सामना १९ जुलै रोजी न्यूजर्सी इथं होणार आहे.