September 29, 2024 5:10 PM | FIFA | Football

printer

फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा पुढच्या वर्षी १५ जूनपासून सुरू होणार

फीफा विश्वचषक फूटबॉल स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. पुढच्या वर्षी म्हणजे १५जून २०२५ रोजी स्पर्धेचं उद्घाटन होणार असून एकूण १२ ठिकाणी सामने खेळले जाणार आहेत. फीफाचे अध्यक्ष गियान्नी इन्फॅन्टिनो यांनी काल सांगितलं की अमेरिकेत न्यू जर्सी इथल्या मेटलाईफ स्टेडीयमवर १३ जुलै २०२५ रोजी अंतिम सामना होईल. ग्लोबल सिटिझन बरोबर  फीफा गरिबी निर्मूलन कार्यक्रमात भागीदार असेल असंही त्यानी जाहीर केलं.