फिडे महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत भारताची दिव्या देशमुख हिनं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत पोहोचलेली ती दुसरी भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. रॅपिड टाय ब्रेक मध्ये दिव्यानं आपल्याच देशाची ग्रँड मास्टर हरिका द्रोणवल्लीचा २-० असा पराभव केला. आता ती अंतिम चारच्या लढतीत आपल्याच देशाची ग्रँड मास्टर कोनेरू हम्पी सोबत सामील झाली असून उपांत्य फेरीत दिव्याचा सामना चीनच्या ग्रँड मास्टर तानझोंगीशी होणार आहे. तर आज संध्याकाळी हम्पीचा सामना दुसरी चिनी ग्रँड मास्टर लेई टिंगजीशी होणार आहे. या स्पर्धेत पहिले ३ क्रमांक पटकावणाऱ्या खेळाडू विमेन्स कँडिडेट्स स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत.
दरम्यान, ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या बुद्धिबळ विश्वकरंडक २०२५ स्पर्धेचं यजमानपद भारताकडे असणार आहे. या संदर्भात लवकरच घोषणा करण्यात येईल, असे फिडे संघटनेने सांगितलं.