फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कोनेरू हंपी आणि दिव्या देशमुख यांच्यात पहिला टप्पा ड्रॉ झाला आहे. या स्पर्धेचं जेतेपद आणि उपविजेतेपदही भारताकडे येणार आहे. त्यामुळे भारताच्या महिला बुद्धिबळाच्या वाटचालीतला हा एक ऐतिहासिक टप्पा ठरला आहे.
या स्पर्धेत जिंकणारी बुद्धिबळपटू पुढल्या वर्षी फिडे महिला कँडिडेट्स टूर्नामेंटमध्ये जागतिक अजिंक्यपदासाठी जू वेंजून हिला आव्हान देईल.