फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताच्याच कोनेरू हंपी आणि दिव्या देशमुख या दोघींमध्ये उद्या अंतिम लढत होणार आहे. काल झालेल्या उपांत्य फेरीत दिव्या देशमुख हिनं चीनची ग्रँडमास्टर तान झाँगयी हिच्यावर मात केली, तर कोनेरू हंपीनं चीनची ग्रँडमास्टर लेई टिंगजिए हिचा पराभव केला. आता या स्पर्धेचं जेतेपद आणि उपविजेतेपद भारताकडे येणार आहे. भारतासाठी हा बुद्धिबळाच्या पटावरचा मोठा मैलाचा दगड ठरणार आहे.
Site Admin | July 25, 2025 1:34 PM | FIDE Women’s Chess
FIDE Women’s Chess : भारताच्या कोनेरू हंपी आणि दिव्या देशमुख यांच्यात अंतिम लढत
