जॉर्जियामध्ये बाटुमी इथं सुरु असलेल्या फिडे महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत चार ग्रँडमास्टर उपांत्यपूर्व फेरीत आणणारा भारत पहिला देश ठरला आहे. कोनेरू हम्पी, दिव्या देशमुख, द्रोणवल्लि हरिका आणि आर वैशाली या त्या चार ग्रॅण्डमास्टर्स आहेत.
या स्पर्धेत उपांत्यफेरी गाठणारे बुद्धिबळपटू २०२६ साली होणाऱ्या विमेन्स कॅन्डीडेट स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत.